8 Mar 2012


कविता

कधी कधी मनाला
सहजच काहीतरी सुचतं,
विचार करता करता ते
कविताच करत बसतं.

मनातील भावना जणू
कवितेत माझ्या उतरतात,
इतरांजवळ हळूच त्या
गुपित माझं उलगडतात.

मनावरचं ओझं थोडं
कमी झाल्यासारखं वाटतं,
ऐकणारं जेव्हा कुणीतरी
कवितेरूपी माझ्याजवळ असतं.

3 Mar 2012

काय गरज आहे मला...

काय गरज आहे मला...
शब्दांत तुला गुंफायची..
कदाचीत अजुनही नाही
माझी पात्रता..
तुला व्यक्त करण्याची..
तुझ्या अदा...तुझं लाजणं..
तुझं हसणं...तुझं बोलणं..
सारं कसं...रेखीव.
मुर्तीमंत सौंदर्याचं लेणं..
अन मी...म्हणजे अगदीच..
एखाद्या निश्चल कातळापरी....
कोणाच्यातरी नजरेची वाट
पाहात पहुडलेला...
त्याच ज्ञात अज्ञाताच्या
पाऊलवाटेवर...
म्हणुनच कदाचीत कोणाचीही अनोळखी
पाऊले वाजली की मन आजही