Showing posts with label कविता. Show all posts
Showing posts with label कविता. Show all posts

8 Mar 2012


कविता

कधी कधी मनाला
सहजच काहीतरी सुचतं,
विचार करता करता ते
कविताच करत बसतं.

मनातील भावना जणू
कवितेत माझ्या उतरतात,
इतरांजवळ हळूच त्या
गुपित माझं उलगडतात.

मनावरचं ओझं थोडं
कमी झाल्यासारखं वाटतं,
ऐकणारं जेव्हा कुणीतरी
कवितेरूपी माझ्याजवळ असतं.